आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोनाचा नवा रुग्ण नाही, दोघे विलगीकरणात

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कुणालाही नव्याने कोरोनाची लागण झाली नाही. परंतु गेल्या काही दिवसांत बाधित झालेल्या रुग्णांपैकी मनपा क्षेत्रातील दोघे जण अजूनही विलगीकरणात आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार १२२ वर पोहोचली असून सुटी घेऊन घरी गेलेल्यांचा आकडा १ लाख ५ हजार ४९२ झाला आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या अहवालातील नोंदीनुसार कोरोना सुरु झाला तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ५९६ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला. त्याचवेळी इतर जिल्ह्यातून या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आलेल्या ३२ जणांनाही या आजारामुळे प्राण गमवावे लागले.

बातम्या आणखी आहेत...