आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक बस:एसटी महामंडळाकडून अमरावतीला इलेक्ट्रिक बसबाबत सूचना नाही

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभागाला किमान ७ इलेक्ट्रिक बसेस मिळणार, असे शासनाने तीन महिन्यांपूर्वी आश्वासन दिले होते. त्यामुळे अमरावती विभागातही प्रदूषण कमी करणारी एसटी धावणार, ती नेमकी कशी असणार अशी उत्सुकता प्रवाशांमध्ये लागून राहीली होती.

आता एसटी महामंडळाकडे काही इलेक्ट्रिक बसेस आल्या असून त्या अमरावती विभागाला मिळणार की आणखी वाट बघावी लागणार याबाबत अद्यापही काही स्पष्ट झाले नाही. नुकतीच इलेक्ट्रिक बसेस कोणकोणत्या विभागाला द्यायच्या, त्यांची संख्या किती असणार याबाबत बैठक झाली. मात्र, या बैठकीत नेमके काय ठरले, याविषयी कोणतीही माहिती बाहेर आली नाही. इलेक्ट्रिक बसबाबत अजूनही महामंडळाकडून अमरावती विभागीय नियंत्रक कार्यालयाला कोणतीही सूचना मिळाली नाही. इलेक्ट्रिक बस अमरावतीलाही मिळावी, अशी प्रवाशांची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...