आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:स्वच्छता कंत्राटाबाबत अजूनही संभ्रम कायम‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी महिन्यात काही कंत्राटदारांचा‎ स्वच्छता कंत्राट संपुष्टात येणार असून‎ काहींचा पुढील एक किंवा दोन महिन्यांत‎ संपुष्टात येणार आहे. अशा स्थितीत‎ जुन्याच कंत्राटाला मुदतवाढ मिळणार की,‎ नव्याने झोननिहाय कंत्राट दिला जाईल,‎ याबाबत संभ्रम आहे. फेब्रुवारी महिना सुरू‎ झाला तरी याबाबत मनपाने अद्याप‎ कोणताही निर्णय घेतला नसल्याने‎ आश्चर्य व्यक्त होत आहे.‎ सध्या मनपात प्रभागनिहाय कंत्राट‎ पद्धती असून, यानुसार २३ कंत्राटदारांकडे‎ दैनंदिन स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले.‎ मनपातील जुन्या पदाधिकाऱ्यांना‎ झोननिहाय कंत्राट असावा असे वाटते.‎ याबाबत त्यांनी मनपा आयुक्तांकडे तसा‎ शब्दही टाकला आहे.

परंतु, कंत्राटदारांचा‎ झोननिहाय कंत्राट देण्यास विरोध आहे.‎ कारण अनेक स्वच्छता कंत्राटदारांची‎ देयके अजूनही मनपाने दिली नाहीत.‎ तसेच जर झोननिहाय कंत्राट देण्यात‎ आला तर एकहाती कारभार दिल्यासारखे‎ होईल, असे सध्या कार्यरत स्वच्छता‎ कंत्राटदारांना वाटते. शहराची दैनंदिन‎ स्वच्छता महत्त्वाची आहे. यात कोणताही‎ अडथळा नको म्हणून नेमका कशाप्रकारे‎ कंत्राट द्यायचा यावर मनपा प्रशासनाचे‎ सध्या मंथन सुरू आहे. ज्या कंत्राटदारांचा‎ फेब्रुवारीत कंत्राट संपणार आहे, त्यांना‎ आपल्या कंत्राटाबाबत मनपाने निर्णय‎ घ्यावा असे वाटते.‎

बातम्या आणखी आहेत...