आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी पत्नीला पळवून नेले!:​​​​​​​साक्षगंध झाला, मात्र मुलगी अल्पवयीन असल्याने थांबवले हाेते लग्न

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या मुलीचा परिचित मुलासोबत काही महिन्यांपूर्वी साक्षगंधही झाला. मात्र मुलीला वयाची १८ वर्षे पूर्ण व्हायची असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न थांबवले. दरम्यान, चार दिवसांपूर्वी मुलीचा भावी पती तिच्या घरी आला. त्या वेळी मुलीची आई भावी जावयासाठी पाणी आणायला स्वयंपाक खोलीत जाताच या भावी जावयाने त्यांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या आईने शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) वलगाव पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलगी व २२ वर्षीय तरुणाच्या कुटुंबीयांनी २० मार्च २०२२ ला दोघांचा साक्षगंध करून दिला. मात्र, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण नाही. ती मुलगी ३ जानेवारी २०२३ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणार आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतरच तिचे लग्न करून देण्याबाबत मुलीच्या कुटुंबीयांची भूमिका होती. दरम्यान, १४ नोव्हेंबरला मुलीचा भावी पती एका मित्रासह मुलीच्या घरी आला. त्याला घरात बसवून मुलीची आई पाणी आणण्यासाठी गेली. त्या पाणी घेऊन येईपर्यंत भावी जावयाने त्यांच्या मुलीला पळवून नेले .

५० दिवसांनंतर होणार होती मुलीला १८ वर्षे पूर्ण
वास्तविक, मुलीला ज्या दिवशी पळवून नेले, त्या दिवसापासून मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी केवळ ५० दिवसांचाच कालावधी बाकी राहिला होता. त्यानंतर त्यांचे लग्न लावून देऊ, असे मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...