आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून अमरावतीत एमएसएमआरएचे राज्य अधिवेशन:आंदोलनात्मक निर्णय होणार; राज्य सरचिटणीसांची माहिती

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय विक्री प्रतिनिधी संघटनेचे (एमएसएमआरए) तीन दिवसीय साठावे राज्य अधिवेशन शुक्रवारी (ता. 10) जूनपासून येथे सुरु होत आहे. सध्याच्या काळात केंद्र सरकारमार्फत विक्रेता प्रतिनिधींवर कठोर आघात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सदर अधिवेशनातून आंदोलनात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे एमएसएमआरएचे राज्य सरचिटणीस श्रीकांत फोपसे यांनी स्पष्ट केले.

शहनाई मंगल कार्यालयात आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सचे (सिटू) उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी साडे चारवाजता होणार असून तीन दिवसांत विविध मान्यवर या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमस्थळी येणार आहेत.

यात जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार सुलभाताई खोडके, केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसीएशनचे जगन्नाथआप्पा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके आदींचा समावेश आहे. तर केमीस्ट अँड ड्रगीस्ट असोसीएशनचे जिल्हाध्यक्ष सौरभ मालाणी या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

फोपसे यांच्या मते सध्या देशभरातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. केंद्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. ते वेगळ्याच मुद्द्यांमध्ये गुंतले आहे. संघटनेने वेळोवेळी या प्रश्नांवर आ‌वाज उठविला आहे. भविष्यातही हीच भूमिका कायम राहील. दरम्यान एमएसएमआरएच्या मूळ प्रश्नांशिवाय संबंधित घटकांच्या मुद्द्यांवरही सदर अधिवेशनात चर्चा केली जाणार असून योग्य ते निर्णय घेतले जाणार आहे.

औषध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून एमएसएमआरएची ओळख आहे. पण त्यासोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून संघटनेने आजवर केलेल्या कार्याचा लेखाजोखाही त्यांनी पत्रपरिषदेत सादर केला.

पत्रकार परिषदेला प्रदेश कोषाध्यक्ष राजेंद्र राठोड, सिटूचे जिल्हा सचिव कॉम्रेड सुभाष पांडे, संघटनेचे प्रादेशिक सचिव अभय देव, युनीट सेक्रेटरी जयेश चांडक, इतर पदाधिकारी मनीष नानोटी, मिलींद थेटे, जयेश सेठिया आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...