आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद:जिल्ह्यात यंदा नसेल पाणीटंचाई, जलाशयांमध्ये 53.94 टक्के साठा; गतवर्षीपेक्षा अधिक

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला. त्यामुळे सद्य:स्थितीत एका मोठ्या, पाच मध्यम आणि ४१ लघु प्रकल्पांत मिळून ५३.९४ टक्के असा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे गतवर्षी १ एप्रिलला या प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ४८.९० टक्के होता. त्यामुळे या वर्षी उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळ कृत्रिम असतो, तर कधी नैसर्गिक. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले व प्रकल्पात बराच जलसाठा शिल्लक आहे. दरवर्षी शेतकऱ्यांपासून ते मुक्या प्राण्यांनाही टंचाईची झळ सोसावी लागल असे. गेल्यावर्षी काही भागात तीव्र पाणीटंचाई होती. तर काही भागातील नागरिकांना थोड्या प्रमाणात टंचाईचे चटके सोसावे लागले. जीवन प्राधिकरणाचे नळ पाच ते सहा दिवसानंतर येत होते.

अनेकांना तर पाण्यासाठी रात्रं-दिवस दूरवरून पाणी आणावे लागत होते. लघु जलाशय कोरडे झाले होते. मात्र, या वर्षी उन्हाळ्याच्या मार्च, एप्रिलमध्ये नागरिकांना पाण्याची चणचण भासणार नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात ऊर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प आहेत. शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन आणि पंढरी असे पाच मध्यम प्रकल्प आहेत. तर लघु प्रकल्प मृदू व जलसंधारण विभागाचे एकूण ४१ लघु प्रकल्प आहेत.

या प्रकल्पात ८०.२५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. मोठा, मध्यम आणि लघु प्रकल्पा मिळून ५१७.५९ दलघनी पाणीसाठा जिल्ह्यातील प्रकल्पात असून, ५३. ९४ टक्के इतका जलसाठा आहे. सध्या प्रकल्पात असलेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, गेल्यावर्षी १ एप्रिलला ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात २९६.३६ दलघमी (५२.५४ टक्के),शहानूर -२९.३७दलघमी(६३.७९) टक्के,चंद्रभागा - २६.२३ दलघमी (६३.५९ टक्क),पूर्णा- २०.६९ दलघमी (५८.५०),सपन - २९.५६ दलघमी (७६.५८) टक्के,पंढरी -४.१२ दलघमी, (७.३०) टक्के तर एकूण लघुप्रकल्प - ६२.९० दलघमी, ३५.३७ टक्के असा मिळून एकूण - ४५९.२३ दलघमी, ४८.९० टक्के उपयुक्त जलसाठा होता.

बातम्या आणखी आहेत...