आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिवसा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई ताबडतोब मिळण्याबाबत आज युवक काँग्रेसच्या नेतृत्वात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी देत व सडलेल्या संत्र्याचा हार घालून निवेदन सादर केले.
यापुर्वीही कोरडा दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा एक ना अनेक आपत्तीची शिकार ठरलेल्या संत्रा उत्पादकांना मदतीचे गाजर दाखवून शासनाने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आणि यावर्षी पहील्यांदाच शासनाने फळबागांचे नुकसान ग्राह्य धरून फळबागांसाठी हेक्टरी 36 हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे तालुक्यात 22 हजार हेक्टरवर उभ्या असलेल्या फळबाग धारकांना या मदतीची आस लागली आहे तरी लवकरात लवकर संत्रा उत्पादकांना मदत मिळावी अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्याकडून तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांचेकडे करण्यात आली.
२०२१-२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांसह आंबिया बहाराच्या संत्र्यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.तेव्हा लगतच्याच तालुक्यातील संत्रा उत्पादकांना शासकीय मदत प्राप्त झाली.परंतु तिवसा तालुक्यातील शेतकरी मात्र अद्यापही मदतीपासून वंचित आहे.तेव्हा ही प्रशासनाची चुक आहे. तेव्हा आर्थिकतेने हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या संत्राबागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता लवकरात लवकर संत्रा उत्पादकांच्या खात्यात अतिवृष्टीसह अन्य नैसर्गिक आपत्तीचा मदतनिधी जमा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी संत्रा उत्पादक शेतकरी जसबीर ठाकूर, गजानन तिजारे, राजिक शेख, प्रशांत प्रधान, अंकुश बायस्कर, शफीक शहा, आशिष बायस्कर, स्वप्नील तुरकाने, अरविंद चोपकर, सूरज धुमनखेडे, प्रवीण बारई, समीर डहाके, किरण पाचघरे, मंगेश वाघमारे, वैभव साबळे, आशिष घाटोळ, अनुप उमप,राजेश धुमंनखेडे, राजन सिराडकर, सचिन बारवाल, सय्यज्याद मुल्ला,पंकज उमप, धनराज खराटे,प्रवीण बेले,प्रफुल लोमटे,गौरव डोंगरे, दिनेश राव ठोसर, लक्ष्मीकांत पाचघरे, नरेंद्र माहुरे, प्रफुल बायस्कर शिवदास बायस्कर शामसुंदर बायस्कर नरेंद्र बायस्कर हर्षल बायस्कर भगवंतराव मुंद्रे, अनुराग बायस्कर, आशिष कांडलकर, हरिभाऊ खेरडे, मोतीराम चोपकर, दिवाकर बायस्कर, प्रवीण भोजने, हर्षद साबळे, चेतन बकाले, कपिल लांडे, अतुल उमप देवेंद्र उमप,आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.