आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅड. सविता संदशिवे खूनप्रकरण:संशयितांचा खटला लढवणार नाही; सर्वसाधारण सभेत जिल्हा वकील संघाचा निर्णय

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यंकय्यापुरा भागातील अ‍ॅड. सविता संदशिवे यांच्या खूनप्रकरणात पोलिसांनी नातेवाईकांना अटक केली आहे. या आरोपींचे जिल्ह्यातील कोणताही वकील वकीलपत्र घेणार नाही, असा निर्णय सोमवारी (12 सप्टेंबर) जिल्हा वकील संघाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

अ‍ॅड. सविता संदनशिवे यांच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर सविता या तिन मुलींना घेवून सासरीच राहत होत्या. यावेळी त्यांना सासू, नणंद व अन्य नातेवाईक प्रचंड त्रास देत होते. यातूनच 8 सप्टेंबरला दुपारी अ‍ॅड. सविता यांचा नंदेने, सासूने त्यांचा गळा दाबून व डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केला व आत्महत्या केल्याचे सांगितले.

नंदेला व सासूला अटक

पोलिसांनी नंदेला व सासूला अटक करून दोन अल्पवयीन मुलींना बाल सुरक्षा गृहात पाठवले आहे. दरम्यान रविवारी दुपारी व्यकंय्यापुरा भागातील अनेक महिला व पुरुषांनी फ्रेजरपुरा ठाण्यात धडक देवून अ‍ॅड. सविता यांना त्यांची सासू सुध्दा प्रचंड त्रास देत होती. असा आरोप करून सासूला तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर अमरावती जिल्हा वकील संघाने सोमवारी शोकसभा घेवून अ‍ॅड. सविता सदंशिवे यांना श्रध्दांजली वाहिली तसेच त्यांच्या खूनप्रकरणातील आरोपींचे कोणताही वकील वकीलपत्र घेणार नसल्याचा निर्णय घेतला. सोबतच सविता यांच्या मुलींना भविष्यात आर्थिक मदत करण्याबाबतही चर्चा झाली असल्याचे अमरावती वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शोएब खान यांनी सांगितले आहे. यावेळी सभेला जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने वकील मंडळी उपस्थित होते.

दिवसभर कामकाज ठेवले बंद

काही दिवसांपूर्वीच अचलपूर येथील एका वकिलाविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग व अ‍ॅट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार आल्यानंतर शहानिशा न करताच गुन्हा दाखल केल्याचा आरोप करुन वकील संघाने सोमवारी दिवसभर कामबंद ठेवल्याचेही वकील संघाचे अध्यक्ष शोएब खान यांनी सांगितले. दरम्यान सर्वच वकील मंडळींनी सोमवारी कामकाज बंद ठेवल्यामुळे अनेक पक्षकारांना काम न होताच न्यायालयातून परत जावे लागले मात्र मंगळवारी (दि.13) सकाळपासून न्यायालयाचे कामकाज नियमीतपणे पूर्ववत सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...