आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोहरा मार्गावरील एका वॉटर पार्कमध्ये गेलेल्या सात युवकांचे सात मोबाइल चोरणाऱ्या दोघांना फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी (दि. २९) अटक केली आहे. या सातपैकी तीन मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून, उर्वरित चार मोबाइलचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. कारण चोरीचे चार माेबाइल चोरट्यांनी ऑनलाइन विकले आहे.
आरीफ खान आबीद खान (१८, रा. फातिमानगर, लालखडी) व सोहेल यासीन कामदार (१८, रा. सुफियान नगर नं १, अमरावती) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. शहरातील दानिश खान अनिस खान (१९, रा. चांदणी चौक) व दानिशचे सहा मित्र असे सात जण २९ जून २०२२ ला पोहरा मार्गावरील एका वॉटर पार्कमध्ये गेले होते. त्यावेळी स्विमींगला जाण्यापूर्वी त्यांनी सात मोबाइल व सात हजार रुपये रोख असा ऐवज एका बॅगमध्ये ठेवला होता. ही कॉलेज बॅग स्विमिंग टॅन्कच्या बाहेरील मोकळ्या जागेत ठेवली. पाण्यातून बाहेर आल्यानंतर दानिश व त्याच्या मित्रांना मोबाइल व रोख ठेवलेली कॉलेज बॅग दिसली नाही.
या प्रकरणात दानिश खानने ३ जुलैला फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सदर गुन्ह्यातील तपासात पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू यांच्यासह पोलिसांनी चोरट्यांची शोधमोहिम सुरू केली. पोलिसांनी तांत्रिकरित्या गुन्ह्याचा तपास करून आरीफ खान व सोहेल यासीन कामदारला अटक केली. या दोघांच्या चौकशीनंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन मोबाइल जप्त केले, तर आरोपींनी इतर चार मोबाइल हे ऑनलाइन जाहिरात देऊन विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. त्या मोबाईलबाबत माहीती काढून ते सुध्दा जप्त करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर, पोलिस निरीक्षक नितीन मगर, पीएसआय गजानन राजमलु, योगेश श्रीवास, हरीश बुंदेले, श्रीकांत खडसे, धनराज ठाकुर व अनुप झगडे यांच्या पथकाने केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.