आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम करायला नवऊर्जा मिळाली:पक्षासाठी झटणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचा हा सत्कार ; आमदार श्रीकांत भारतीय

अमरावती10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला आमदारांनी निवडून विधान परिषदेत पाठवले तरी मी अमरावतीचाच आमदार आहे. जिल्ह्याच्या अनेक समस्या असल्या तरी समस्याचे निराकरण करण्याची क्षमता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आज कोणता आमदार किंवा खासदार काय म्हणतात, याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष न देता निष्ठेने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवावी, असे आवाहन करून माझाच नव्हे तर पक्षासाठी झटणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचा हा सत्कार असल्याचे मत नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी आपल्या सत्कार व शुभेच्छा सोहळ्याला उत्तर देताना व्यक्त केले.

विधान परिषदेच्या सदस्य पदी नुकतीच निवड झालेले भाजपाचे प्रदेश संघटन महामंत्री आ.श्रीकांत भारतीय यांचा भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ.रामदास आंबटकर होते. आ.डॉ. रणजीत पाटील, आ. प्रताप अडसड, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, भाजप शहर अध्यक्ष किरण पातुरकर, प्रा. रवींद्र खांडेकर जयंत डेहणकर, माजी सभागृह नेते तुषार भारतीय, किरण महल्ले , डॉ नितीन धांडे , माजी आ. प्रभुदास भिलावेकर, रमेश बुंदिले, संध्या टिकले , प्रमोद कोरडे , विराज देशमुख , कमलकांत लाडोळे, संजय पोकळे ,रुपेश मांडवे , माजी महापौर चेतन गावंडे, प्रशांत शेगोकर, प्रवीण तायडे, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

१९९० मध्ये जगदीश गुप्ता यांच्या विजयाने अमरावतीत भाजपच्या विजयाचे पर्व सुरू झाले होते. त्या काळाचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत, असे भारतीय म्हणाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ. श्रीकांत भारतीय व श्रेया भारतीय यांचा भाजप ग्रामीण व शहर जिल्ह्यातर्फे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.यावेळी निवेदिता चौधरी, प्रा. रवी खांडेकर, किरण महल्ले, जयंत डेहनकर, आ. डॉ. रणजित पाटील यांनी आपले विचार व्यक्त करून आमदार भारतीय यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माजी महापौर चेतन गावंडे यांनी केले.