आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्य प्राण्याची शिकार:सायाळ शिकारप्रकरणी तिघांना पकडले; वन विभागाची कारवाई

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सायाळ या वन्य प्राण्याची शिकार करून ते मांस विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना वडाळी वन विभागाने रंगेहाथ पकडले. तसेच अन्य एक अशा एकूण तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवारी केली असून, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.आरिकशा सरीकशाम पवार (३१), आयसिंग सरीचंद पवार (३० दोघेही रा. वाकपूर, नांदगाव खंडेश्वर) आणि जगदिश आनंदराव तेटू (रा. अंजनगाव बारी) या तिघांना ताब्यात घेतले आहे. वडाळी वन परिक्षेत्रातील अंजनगाव बारी गावाजवळ ही कारवाई केली असून, वन विभागाने संशयित शिकाऱ्यांच्या ताब्यातून सायाळचे मांस व दोन पंजे, पिशवी, पोती, लाकूड, चाकू व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सायाळची शिकार कुठे व कधी झाली, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. या बाबत वन विभागाकडून माहिती घेतली जात आहे. सायाळ हा प्राणी पूर्वी ‘शेड्यूल ४’ मध्ये होता मात्र नवीन वर्गवारीनुसार सायाळ हा शेड्यूल २ मध्ये आला.

बातम्या आणखी आहेत...