आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेटला कुलूप पण दार उघडे!:तिवसा शहरात एकाच रात्री तीन घरफोड्या; पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दिवसेंदिवस घरफोडींचे सत्र सुरूच आहे. तिवसा शहरातील शहरातील वॉर्ड क्रमांक १७ च्या परिसरात व सोटागिर महाराज देवस्थानजवळ कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात तीन ठिकाणी घरफोड्या केल्या. मात्र तेथून मुद्देमाल त्यांना गवसला नसल्याने यात ते अयशस्वी ठरले.

काय आहे घटना?

या तिन्ही प्रकरणात चोरांनी कुंपन भिंतीतील दाराचे कुलूप जसेच्या तसे ठेवले. परंतु आतील दाराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरीसाठी त्यांना ऐवज हाती न लागल्याने त्यांचा हिरमोड झाला. परंतु घरमालकांचा घरी मात्र चोरी झाली नाही. काही दिवसांपूर्वी मोझरी येथे सुद्धा 4 ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. त्या घटना ताज्या असताना आज, गुरुवारी पहाटे अर्थात बुधवारच्या मध्यरात्रीनंतर कुण्यातरी भुरट्या चोरट्यांनी प्रभाग क्रमांक 17 मधील विलास मेंढे व पुष्पा नागदेवते यांच्या बाहेरील गेटचे कुलूप जैसे थे ठेवून घराच्या दाराचा कुलुपकोंडा तोडून आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी तेथून पळ काढला.

सोटागिर महाराज देवस्थानजवळ आकाश धाडांगे यांचे भरवस्तीतील घर फोडून त्यांनी ऐवजाचा शोध घेत तेथून पळ काढला. आज पहाटे परिसरातील नागरिकांना या तीनही घरांची दारे उघडी दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तिवसा पोलिसांनी या घटनेची माहिती जाणून घेतली असून अद्यापपर्यंत कुणाचीही लेखी तक्रार मात्र , पोलीस स्टेशनपर्यंत गेलेली नाही. असे असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिसांनी रात्रगस्त वाढविणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

बातम्या आणखी आहेत...