आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोड्या:तिवसा शहरात एकाच रात्री तीन घरफोड्या

तिवसा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिसांची रात्रगस्त असेल तरीही चोरट्यांना काही भीती नाही, अशी काहीशी प्रचिती गुरुवारी तिवसा शहरात आली. शहरातील वॉर्ड क्रमांक १७ च्या परिसरात व सोटागिर महाराज देवस्थानजवळ कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात तीन ठिकाणी घरफोड्या केल्या. मात्र तेथून मुद्देमाल त्यांना गवसला नसल्याने यात ते अयशस्वी ठरले.

विशेष असे की या तिन्ही प्रकरणात चोरांनी कुंपण भिंतीतील दाराचे कुलूप जसेच्या तसे ठेवले. परंतु आतील दाराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरीसाठी त्यांना ऐवज हाती न लागल्याने त्यांचा हिरमोड झाला. परंतु वाचलो एकदाचे असे म्हणत या घरमालकांचा जीव मात्र चोरी झाली नाही, हे कळल्यावर भांड्यात पडला. काही दिवसांपूर्वी मोझरी येथे सुद्धा ४ ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला.

त्या घटना ताज्या असताना गुरुवारी पहाटे अर्थात बुधवारच्या मध्यरात्रीनंतर भुरट्या चोरट्यांनी प्रभाग क्रमांक १७ मधील विलास मेंढे व पुष्पा नागदेवते यांच्या बाहेरील गेटचे कुलूप जैसे थे ठेवून घराच्या दाराचा कुलुप कोंडा तोडून आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच न लागल्याने त्यांनी तेथून पळ काढला. सोटागिर महाराज देवस्थानाजवळ आकाश धाडांगे यांचे भरवस्तीतीत घर फोडून त्यांनी ऐवजाचा शोध घेत तेथून पळ काढला. आज पहाटे परिसरातील नागरिकांना या तीनही घरांची दारे उघडी दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तिवसा पोलिसांनी या घटनेची माहिती जाणून घेतली असून, अद्याप पर्यंत कोणाचीही लेखी तक्रार मात्र पोलिस स्टेशनपर्यंत गेलेली नाही. असे असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी रात्र गस्त वाढवणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे

बातम्या आणखी आहेत...