आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पहिल्याच दिवशी केला तीनशे तक्रारींचा निपटारा; तहसीलदारांची मात्र अनुपस्थिती, ‘आमदार आपल्या दारी’ योजनेचा शिदोडीत प्रारंभ​​​​​​​

धामणगाव रेल्वे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य माणसाच्या समस्या, तक्रारी त्यांच्या गावातच सोडवण्यासाठी आमदार प्रताप अडसड यांनी आज, सोमवारपासून महाराजस्व अभियान सुरु केले. या अभियानाद्वारे राबवलेल्या ‘आमदार आपल्या गावी’ या उपक्रमात पहिल्याच दिवशी तीन गावात तीनशे तक्रारीचा निपटारा करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमाला मुख्य जवाबदारी असलेले तहसीलदार प्रदीप शेलार स्वतःच अनुपस्थित असल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी खासदार व आमदारांनी केली आहे.

सर्वसामान्यांच्या समस्या गावातच निकाली निघाव्या व शासन प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी शासनाच्या राजस्व अभियानांतर्गत आ. प्रताप अडसड यांनी पहिल्या टप्प्यात तीन तालुक्यातील ५० गावात हे अभियान राबवायला सुरुवात केली. ९ मे रोजी सकाळी ९ वाजता शिदोडी या गावात अभियानाचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रताप अडसड यांच्यासह गटविकास अधिकारी माया वानखडे, नायब तहसीलदार ए बी विर, पं स सदस्य राजकुमार केला, नरेंद्र रामावत, सरपंच करिष्मा शिवरकर, उपसरपंच रितेश निस्ताने, मंगेश बोबडे, रोशन कोंबे, मनोज डहाके, बाळासाहेब शिरपूरकर, माया हेबांडे, संगीता गवई, विस्तार अधिकारी चव्हाण, मिलींद ठुनुकले, नरेंद्र इंगळे, कन्नमवार उपस्थित होते.

घरकुल, वीज पुरवठा, पाणी समस्या, पुनर्वसन, रस्ते, नाली, पशू संवर्धन, रोजगार हमी योजना, आरोग्याच्या अडचणी, श्रावण बाळ योजनेपासून वंचित अशा विविध समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. लोकशाहीला अधिक कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आमदार आपल्या गावी आल्याने प्रश्न सोडवून घ्यावे, असे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस यांची केले. शिदोडी, झाडा, वसाड या गावातून महसूल, पंचायत, साबावि. आरोग्य, नझुल, गृह, वीज, महिला बाल कल्याण, कृषी आदी विभागाच्या एक हजारावर तक्रारी प्राप्त झाल्या. यात उपस्थित असलेल्या १३ प्रशासकीय विभागाने ३०० तक्रारींचा निपटारा केला.

बातम्या आणखी आहेत...