आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:गोपालनगरात तीन‎ कोरोनाचे नवे रुग्ण‎

अमरावती‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रातील गोपालनगर‎ भागातील तिघांना कोरोनाची लागण‎ झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट‎ झाले आहे. या तिघांपैकी दोन पुरुष‎ असून, एक महिला आहे. तिघांचेही‎ वय ४२ ते ५१ वर्षांच्या दरम्यान‎ असून, त्यांनी गृहविलगीकरणाचा‎ पर्याय स्वीकारला आहे. या तीन‎ नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण‎ कोरोनाबाधीतांची संख्या पाच झाली‎ आहे.

त्याचवेळी जिल्ह्यातील‎ आतापर्यंतच्या कोरोनाबाधीतांची‎ एकूण संख्या १ लाख ७ हजार १३५‎ झाली असून, त्यापैकी १ लाख ५‎ हजार ५०२ रुग्णांनी कोरोनावर‎ विजय प्राप्त करीत सुटी घेतली‎ आहे. या आजारामुळे आतापर्यंत १‎ हजार ५९६ जणांचा मृत्यू झाला‎ असून उपचारासाठी अमरावतीत‎ दाखल झालेल्या ३२ जणांनाही प्राण‎ गमवावे लागले. नव्याने आढळून‎ आलेला कोरोनाबाधीत अंबागेटच्या‎ आतील बुधवारा परिसरातील‎ रहिवासी असलेला पुरुष आहे.‎

बातम्या आणखी आहेत...