आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात प्रथमच एकाचवेळी एकाच ठिकाणी ४ ते १५ वर्षांपर्यंतचे ३ हजारावर विद्यार्थी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत चित्रे काढून कल्पकतेचा परिचय देणार आहेत. या विक्रमाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड, आशिया बुक आॅफ रेकाॅर्ड आणि इंटरनॅशनल बुक आॅफ रेकॉर्डमध्ये घेतली जाणार असल्याची माहिती जेसीआय अमरावतीचे अध्यक्ष जयेश पनपालिया यांनी दिली.
जेसीआय अमरावतीच्या वतीने तसेच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पीडीएल स्काॅलर्स अकादमीच्या सहकार्याने एचव्हीपीएम येथील खुल्या स्टेडियममध्ये रविवार १८ डिसेंबर रोजी दु. २ ते ५ या कालावधीत चार गटांमध्ये ही चित्रकला स्पर्धा २०२२ घेतली जाईल. पहिला गट केजी वन ते पहिला वर्ग, दुसरा गट दुसरा वर्ग ते चौथा वर्ग असा असेल. या दोन्ही गटांना रेखाचित्र तयार करून दिले जातील. त्यात त्यांना रंग भरायचे आहेत. तिसरा गट हा ५ वी ते ७ वा वर्ग असा राहणार असून, यांना स्मार्ट सिटी,
मोठ्या संख्येत विविध पुरस्कार देणार
चारपैकी प्रत्येक गटातील विजेत्याला ५ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये व चषक आणि तृतीय पुरस्कारासाठी २ हजार रुपये व चषक प्रदान केला जाणार आहे. असे रोख ४० हजाराचे पुरस्कार प्रदान केले जातील. यासोबतच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र, ३०० पेक्षा जास्त चषक, २०० पेक्षा जास्त प्रोत्साहनपर बक्षिसं आणि २०० पेक्षा जास्त सरप्राईज गिफ्ट दिले जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.