आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजाआड:गळ्याला चाकु लावून लुटणाऱ्या तिघांना; ट्रकचालकाला लुटणारे तिघे गजाआड

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसी परिसरात दोन ट्रकचालकांच्या गळ्याला चाकु लावून लुटणाऱ्या तिघांना राजा पेठ पोलिसांनी मंगळवारी (दि. २८) अटक केली आहे. या तिन लुटारूंकडून पोलिसांनी १ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख इरशाद शेख इरफान (२३), अभिषेक गणेश मेहसरे (१९) व सुमित सुनिल उमाळे (१९, तिघेही रा. लोणी टाकळी) अशी अटक केलेल्या लूटारुंची नावे आहेत. मोहम्मद इरशाद वल्द मोहम्मद ईलियात या उत्तरप्रदेशातील ट्रक चालकाला २० हजारांनी तर, अन्य एका ट्रकचालकाला १४ हजार २०० रुपयांनी लुटण्यात आले होते. एमआयडीसी परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी राजापेठ पोलिसांनी २१ जुनला अज्ञातांविरूद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी एमआयडीसीतील वाटमारीची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात हिसकावून नेलेल्या मुद्देमालापैकी चांदीची चेन, ३ हजार ५०० रुपये रोख, एक विना क्रमांकाची दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, सत्तुर दोन मोबाइल जप्त करण्यात आले. राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर, उपनिरिक्षक गजानन काठेवाडे, दीपक सराटे, अतुल संभे, रवि लिखितकर, दानिश शेख, राहुल फेरन, राहुल ढेंगेकार यांनी ही कारवाई केली.