आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाचा मृत्यू:गोंदिया जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू ; वन्यप्राण्यांसाठी अंडरपास बांधण्याची मागणी

गोंदिया17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वन परिक्षेत्रातील वडेगाव ते वडसा रेल्वेमार्गावर कोरंभीजवळ रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्याचे वय साधारणतः ६ वर्षांचे असावे. हा वाघ लाखांदूर भागातील असावा, असा वन कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे. कारण मागील दोन ते तीन महिन्यांपासून त्याचे या भागात वास्तव्य होते. त्याचे फोटोही मिळालेले आहेत. अपघातात वाघाचा मागील डावीकडचा पाय तुटलेला असून, कमरेवरही मोठी जखम आहे. तोंडावरही जखम असून भरपूर रक्त वाहिलेले आहे. वन विभागाने राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या गाइडलाइननुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी २०१८ मध्ये रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा तसेच वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्गावरील चिखली कन्हारगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ दोन वर्षीय बिबट्याचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. राजोली वन परिक्षेत्रांतर्गतच्या चिखलीच्या जंगलातून रेल्वेमार्ग गेलेला आहे. या जंगल परिसरात मोठ्या संख्येने वन्यप्राणी असून, यापूर्वीही रेल्वेच्या धडकेत प्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी अंडरपास बांधण्याची मागणी आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

बातम्या आणखी आहेत...