आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक:डाव्यांनीही सुरु केली चाचपणी; आयटक, विद्यार्थी, युवक आघाडीची बैठक

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात होऊ घातलेली विधानपरिषदेची अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याबाबत डावे पक्ष आणि समविचारी संघटनांनीही चाचपणी सुरु केली आहे. भाकपच्या नेतृत्वातील ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या श्रमिकांच्या संघटनेसह एआयएसएसएफ आणि एआयवायएफने याबाबत रितसर बैठक घेऊन तसे संकेत दिले आहे.

आमदार डॉ. रणजीत पाटील यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत संपुष्टात येईल. त्यामुळे सध्या या निवडणुकीची राजकीय व प्रशासकीय तयारी सुरु झाली आहे. राजकीय स्तरावर महत्तम मतदार नोंदणीचे कार्य अलिकडेच पूर्णत्वास गेले तर दुसरीकडे प्रशासकीय तयारी म्हणून या निवडणुकीची मतदार यादी तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात पोहोचले आहे. भाकप आणि या पक्षाच्या नेतृत्वातील वेगवेेगळ्या जनसंघटनांनी मतदार नोंदणीत सक्रीय सहभाग घेऊन या निवडणुकीचा पाया पक्का करण्याचे काम केले आहे. त्यामुळे येत्या काळात स्वत:चा उमेदवार उभा करायचा की समविचारी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, याबाबत खलबते केली जात आहेत.

या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन चौकातील उर्जा भवनात एक संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक), प्रगतिशील लेखक संघ (प्रलेसं), ऑल इंडिया युथ फेडरेशन (अ.भा. नौजवान सभा) व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे (एआयएसएफ) पदाधिकारी उपस्थित होते. आयटकचे जिल्हाध्यक्ष जे. एम. कोठारी, अशोक सोनारकर, निळकंठ ढोके, प्रगतिशील लेखक संघाचे प्रा. डॉ. महेंद्र मेटे, प्रा. संजय घरडे, सिनेट सदस्य प्रा. कैलास चव्हाण, एआयएसएफचे योगेश चव्हाण, धीरज बनकर, शुभम बाळापुरे, एआयवायएफचे कैलास ठाकरे, प्रेमदास वाडकर, सागर दुर्योधन, सुनील घटाळे आदी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आपल्या भूमिका मांडल्या.

डॉ. कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली, प्रा. चव्हाण यांचा सत्कार

या बैठकीत प्रगतिशील लेखक संघाचे दिवंगत राज्याध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचवेळी नवनियुक्त सिनेट सदस्य प्रा. कैलास चव्हाण यांचा सत्कारही करण्यात आला. प्रा. कैलास चव्हाण यांच्या माध्यमातून एआयएसएफने पहिल्यांदाच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक जिंकली आहे, हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...