आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या शहर विभागाकडून महावितरण आपल्या दारी उपक्रमातून तौकिक नगर, लालखेडी, रिंग रोड भागातील अवैध वीज वापरणाऱ्या नागरिकांना मेळाव्यातून वीज जोडण्या देण्यात आल्या.
शहरातील इमाम नगर, ताज आणि चित्रा वीज वाहिनीवर सरासरी ७० टक्क्यांपेक्षा जास्त वीज हानी असल्याने मुख्य कार्यालयाकडून या वाहिनीवरील वीज हानी २० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार शहर विभागाकडून या वाहिन्यांवर सतत वीज मीटर तपासण्याची मोहीम घेतली असता, इमाम नगर वाहिनीवर १०८ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
त्याचबरोबर या वाहिनीवरील तौकिक नगर, लालखेडी, रिंग रोड भागातील सुमारे २०० पेक्षा जास्त नागरिक आकोडे टाकून वीज वापरत होते. तसेच अधिकृत वीज जोडणी घेण्याचा पाठपुरावा करत अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांकडून अधिकृत वीज जोडणीसाठी अर्ज भरून घेत एकाच दिवसात ७० अधिकृत वीज जोडण्या देण्यात आल्या. या वेळी नियमित वीज बिल भरण्याचे आणि वीज चोरी टाळण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता खानंदे यांनी केले. उर्वरित नागरिकांकडून अर्ज भरून घेऊन त्यांनाही लवकरच वीज जोडण्या देण्यात येणार आहेत. यासाठी लागणारे रोहित्र व वीज वाहिनीचे कामही तत्काळ सुरू करण्यात आले. या संपूर्ण कामासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास शहाडे व उपकार्यकारी अभियंता राजपाल गेडाम यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.