आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीईमध्ये लॉटरी लागलेल्या जिल्ह्यातील २२१३ पाल्यांपैकी सोमवारी शेवटच्या दिवसांपर्यंत १ हजार ४५८ प्रवेश निश्चित झाले तर ७३६ जागा अजूनही शिल्लक आहेत. याशिवाय भातकुली तालुक्यात १९ पालकांचा पाल्यांच्या प्रवेशाचा नो रिस्पॉन्स आहेत. प्रवेशाकरिता १० मे पर्यंतच मुदत असल्याने एका दिवसात आणखी किती प्रवेश निश्चित होतात याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात शिक्षण विभागाने २४० शाळांमधील २ हजार २५५ रिक्त जागांकरिता प्रवेश प्रक्रिया राबवली होती. याअंतर्गत १० मार्चपर्यंत प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ८ हजार ५० अर्ज प्राप्त झाले यातील ८ हजार ११ अर्ज ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे या अर्जाकरिता ३० मार्च रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आले. याची यादी ४ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये २ हजार २१३ पाल्यांची लॉटरी लागली तर तितक्याच पाल्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर ६ एप्रिलपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.
यापूर्वी अमरावती शहरात महापालिका आणि ग्रामीण भागात तालुकास्तरीय समितीकडून कागदोपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रवेशाकरिता २० एप्रिलपर्यंची डेडलाइन देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ करून २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली.
मात्र, पाल्यांचे प्रवेश संथ गतीने होत असल्याचे शिक्षण विभागाने १० मेपर्यंत आरटीई प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली होती.यात ९ मेपर्यंत सात दिवसात केवळ ६९ प्रवेशांची भर पडली आहे. त्यामुळे आता उर्वरीत ७३६ प्रवेश मंगळवारी एका दिवसात होईल का याकडे लक्ष लागले आहे. अन्यथा प्रतीक्षा यादीतील पाल्यांना संधी दिली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.