आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:उद्या 9 नगर परिषदांच्या वॉर्डांचे आरक्षण ठरणार ; एससी, एसटी, महिलांचे आरक्षण निश्चित होणार

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेपाठोपाठ जिल्ह्यातील नऊ नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार, दि. १३ जून रोजी या नगरपालिकांमधील वाऱ्यांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. कोणता वॉर्ड एससीसाठी, कोणता एसटीसाठी तर कोणता महिलांसाठी हे या सोडतीद्वारे निश्चित केले जाईल. ओबीसीचा मुद्दा न्यायप्रविष्ट झाल्यामुळे सध्या त्या संवर्गाचे आरक्षण ठरवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश नाहीत. दरम्यान, आरक्षण निश्चित होणार असल्याने कुणाला धक्का बसणार आणि कुणाला लॉटरी लागणार, हेही स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हे आरक्षण सोडतीकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आरक्षणाची प्रक्रिया कशी राबवायची, या संदर्भातील सविस्तर आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सर्व नगरपालिकांना जारी केला असून, ८ नगरपालिकांमध्ये सकाळी ११ वाजता तर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीमध्ये दुपारी २ वाजता सोडत काढली जाणार आहे. धारणी नगरपंचायत आणि चांदूर रेल्वे नगरपालिका येथे दुपारी ४ वाजता सोडतीची कारवाई सुरु होईल. त्या-त्या भागाचे एसडीओ आणि काही ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीत संबंधित नगरपालिका व नगरपंचायतींचे प्रशासक सोडतीची कारवाई पूर्ण करतील.

बातम्या आणखी आहेत...