आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात सुमारे दीड तास मुसळधार पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे मंगळवारी काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळी ४ वाजेपासून ते ५.३० पर्यंत दीड तास पाऊस झाला. त्यामुळे शहरात तीन भागात पाणी साचले तसेच चार ठिकाणी झाडे कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अग्निशमन विभागाने पथकं पाठवून झाडे बाजूला केली. मात्र रंगोलीलॉन परिसरातील झाड तारावर कोसळल्यामुळे झाड बाजूला करण्याचे काम सुरू होते.
कठोरा नाका मार्गावरील रंगोलीलॉन परिसरातील एका कॉलनीत मुसळधार पावसामुळे झाड विद्युत तारांवर कोसळले. त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. अग्निशमन पथकाने हे झाड कापून त्याचा काही भाग तारांपासून वेगळा केला. त्याचप्रमाणे दस्तूरनगर परिसरात एक झाड कोसळले. तेही अग्निशमन विभागाने रस्त्याच्या बाजूला करून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला. यासोबतच बडनेरा नवी वस्ती व जुनी वस्ती भागातही दोन झाडे कोसळली. तीही बाजूला करण्यात आली. धामणगाव परिसरात धुवाधार मंगळवारी सायंकाळी सर्वदूर झालेल्या जोरदार पावसाने शेतकरी वर्ग सुखावला. मात्र तालुक्यातील काही भागात जोरदार बरसलेल्या या पहिल्याच पावसाने लहान-मोठे नाले भरून वाहू लागले असून, लेंडी नाल्याला मोठा पूर आला. परिणामी काही गावांतील जनजीवन विस्कळीत झाले.लेंडी नाल्याला मोठा पूर आला. परिणामी काही गावांतील जनजीवन विस्कळीत झाले.मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आभाळ दाटून आले. पाठोपाठ ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे लहान मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला. जुना धामणगाव येथील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली तर दाभाडा परिसरात शेतजमिनीत पावसाचे पाणी साचले.कुऱ्हा परिसरातही धुंवाधार:दुपारी ४.३० च्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह धुंवाधार पाऊस कोसळला. त्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्ग आनंदित झाला असून पेरणीला वेग येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.