आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:‘कोल्ड्रिंक’मध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार ; तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी साईनगर भागात बोलावून कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकले व त्यानंतर अत्याचार केला. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वीसुद्धा जबरीने अत्याचार केला, अशी तक्रार एका २२ वर्षीय पीडित तरुणीने दिली. या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी रविवार, १२ जूनला शुभम मुरलीधर बोंडे (२७, रा. अमरावती)या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने २०१६ मध्ये बीएससीला (संगणक) शहरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. दरम्यान २०१८ मध्ये पीडित तरुणी तीच्या महाविद्यालयातून विद्याभारती महाविद्यालयात एका कंपनीच्या मुलाखतीसाठी गेली होती. त्याचवेळी तरुणीची शुभमसोबत भेट झाली व त्यांच्यात ओळख झाली. त्याचवेळी शुभमने तुला शिक्षणासाठी काही मदत लागली तर सांग, असे तरुणीला सांगितले हाेते. दरम्यान ६ जानेवारी २०१९ ला शुभमने पीडित तरुणीला फोन करून मला तुझ्या लॅपटॉपचे काम आहे, त्यामुळे तू अकोली ते खंडेलवालनगर मार्गावरील एका अपार्टमेंटजवळ ये, असे सांगितले. ओळख असल्यामुळे ही तरुणी लॅपटॉप घेऊन गेली. त्यावेळी शुभमने अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये तरुणीला नेले. कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने शुभमवर केला. तसेच या प्रकरणाबाबत कोणालाही सांगायचे नाही, सांगितल्यास तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १९ मार्च २०२२ ला सुद्धा शुभमने अतिप्रसंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतरही फोन करून तरुणीला तो बोलावतो व न आल्यास बदनामी करेल, अशी धमकी देतो, या आशयाची तक्रार पीडित तरुणीने बडनेरा पोलिसांत दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शुभम बोंडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...