आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; दशासर पोलिसांत गुन्हा दाखल

अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला प्रेम जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्यावर ३ ते ४ वेळा अत्याचार केला. यातूनच ही अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. ही धक्कादायक घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. या प्रकरणी पीडीत तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शनिवारी (दि. १८) २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गौरव संजय बावणे (२०, रा. खरपी, ता. चांदूर रेल्वे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडीत अल्पवयीन मुलीची आई ही गौरवसोबत केटरिंगच्या कामासाठी जात होती. दरम्यान आईसोबत पीडीत मुलगीसुद्धा अधूनमधून कॅटरर्सच्या कामावर जात होती. त्यावेळी मुलीची ओळख गौरवसोबत झाली. त्यानंतर बोलचालीतून दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दरम्यान गौरवने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधून शारिरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यामुळे ती मुलगी गर्भवती राहीली. हा प्रकार मुलीने आईला सांगितला व आईसोबत तळेगाव दशासर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गौरव बावणेविरुद्ध बलात्कार तसेच पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...