आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Tourism Minister Thackeray Positive For Shivsrushti, Chikhaldara Skywalk Development Fund; Amravati District Will Be Developed In Terms Of Tourism|marathi News

पालकमंत्री ठाकूर यांची माहिती:शिवसृष्टी, चिखलदरा स्कायवॉक विकास निधीसाठी पर्यटन मंत्री ठाकरे सकारात्मक; पर्यटनदृष्ट्या अमरावती जिल्हा होणार विकसित

अमरावती7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शहरात शिवटेकडी येथील नियोजित शिवसृष्टी, वडाळी तलाव विकास व सुशोभीकरण, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान, तसेच श्री क्षेत्र कौंडण्यपूर, चिखलदरा येथील स्काय वॉक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या विविध महत्वपूर्ण स्थळांच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यास राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली असून, अमरावती जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यास चालना मिळणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवार,दि. ७ रोजी दिली.

शहरातील शिवटेकडी, वडाळी तलाव यांचा विकास व सुशोभीकरण, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान, तसेच जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर, केकतपूर, शेवती, संगमेश्वर या पर्यटनस्थळांच्या विकासाकरिताठी निधी मिळवून देण्याबाबत पर्यटनमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विकास आराखडा, संत गाडगेबाबा विकास आराखड्यातील उर्वरित कामांना चालना मिळण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार ही कामे लवकरच पूर्णत्वास जातील व जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. महिलांच्या मानसिक, शारिरिक व बौद्धिक पोषणाकडे लहानपणापासून लक्ष पुरवणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदा पोषण माह उपक्रमात अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात आले.या उपक्रमात सातत्य राखण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

शिवटेकडीवर साकारणार शिवसृष्टी
शहराच्‍या मध्यवस्‍तीत शिवटेकडी असून, त्‍याठिकाणी शिवसृष्‍टीची उभारणी करण्‍याचे काम सुरू झाले आहे. नियोजित आहे. त्याबाबत तीन कोटी रूपये निधीची मान्यता प्राप्त आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० लाख निधी प्राप्त झाला. तसेच उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान
वडाळी येथे ब्रिटिशकालीन तलाव असून, त्याठिकाणी उद्यानही विकसित आहे. लगतच बांबू गार्डन हे पर्यटनस्थळ विकसित आहे. एस.आर.पी.कॅम्‍प, वन विभाग व महापालिका यांच्‍या जमिनी व नैसर्गिक संसाधने परिपूर्ण असलेले दोन तलाव व नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या भूभागावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली. आवश्यक तो सर्व निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पर्यटन मंत्र्यांनी यावेळी दिली. चिखलदरा येथील स्काय वॉकच्या कामासाठीही तत्काळ निधी उपलब्ध करून दिला जाईल. हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. चिखलदरा येथे महत्वपूर्ण सुविधा याद्वारे निर्माण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...