आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:खेड पिंपरी येथे शेतीशाळेमध्ये प्रशिक्षण; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नांदगाव खडेश्वर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खेड पिंपरी येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता मूल्य साखळी विकास योजनेंतर्गत नुकतीच शेतकऱ्यांची शेती शाळा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेती शाळेला मार्गदर्शक म्हणून कृषि सहाय्यक अजय माहूरे होते. त्यांनी कीड मित्र की शत्रू, सोयाबीनवरील प्रमुख कीडी व रोग, त्यावरील उपाय योजना, खोडमाशी व चक्रिभुंगा या विषयी मार्गदर्शन केले, तसेच फेरोमन ट्रॅपचा वापर व पिवळे चिकट सापळे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खताच्या मात्रा तसेच तुर पिकावरील शेंडा खुडणे, कृषी विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती दिली. शेती शाळेला शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...