आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:व्याघ्र प्रकल्पातील गार्ड्सला आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांचे अधिक सक्षमपणे शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी २००६ नंतर प्रथमच वन परिक्षेत्र अधिकारी, वनपालांसह वनरक्षकांना आधुनिक शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती विभागीय वनअधिकाऱ्यांनी दिली.

या शस्त्रांचा उपयोग स्व रक्षणासाठीही व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना करता येणार आहे. ९ एमएम पिस्टल, एसएलआर रायफल, १२ बोअर गन आणि इंसास रायफल चालवण्यासह त्यांची देखभाल, रखरखावाचे प्रशिक्षण नुकतेच राज्य राखीव पोलीस गट क्र. १ अमरावती यांनी दिले. ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तुकडीने हे प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतरही आणखी ५० अधिकारी कर्मचाऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जंगलाचे रक्षण, शिकारी, तस्करांपासून स्वत:सह विविध वन्य जीवांचे रक्षण करताना या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण उपयोगी ठरेल. आजवर वन कर्मचारी हे जुन्या बनावटीच्या शस्त्रांचा वापर करून जंगलाचे रक्षण करायचे. त्या तुलनेत शिकारी, तस्कर उत्तम दर्जाचे आधुनिक शस्त्र वापरायचे. ही उणीव लक्षात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक शस्त्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ५० जणांच्या पहिल्या तुकडीने प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

शस्त्रांची सुरक्षित हाताळणी, देखभालीचे प्रशिक्षण
शिकाऱ्यांपासून वन्य प्राण्यांच्या रक्षणासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गार्ड्सला आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शस्त्र अधिक सुरक्षितपणे हाताळणे, त्यांची देखभालही कशी करायचे याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले आहे. -मनोजकुमार खैरनार, डीएफओ, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.

बातम्या आणखी आहेत...