आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Transfer Doctor Pharmacist Masanganj Municipal Hospital | Commissioner Aggressive For Not Coming On Time; 30 Thousand Citizens Depend On The Hospital Amravati

मसानगंज मनपा दवाखान्यातील डाॅक्टरसह फार्मासिस्टची बदली:वेळेवर येत नसल्याने आयुक्त आक्रमक

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्तव्यावर अनुपस्थित राहणारे मसानगंज मनपा दवाखान्यातील डाॅक्टर व फार्मासिस्टची मनपा आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली असून येथील डाॅक्टरकडे दोन दवाखान्यांची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना पूर्णवेळ तारखेडा येथील मनपाच्या हाॅस्पिटलची जबाबदारी देण्यात आली आहे.

रतनगंज येथील नीलेश उईके यांनी मसानगंज येथील दवाखान्याबाबत 20 ऑगस्ट रोजी मिशन सत्यता ऑपरेशन केले होते. त्यावेळी दवाखाना उशीरा उघडला जात असून डाॅक्टर व फार्मासिस्ट येथे वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे जीओ टॅग फोटोसह सिद्ध झाले होते. त्यानंतर मनपा आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत डाॅ. विजय मोटघरे व फार्मासिस्ट अविनाश खापर्डे यांची बदली केली.

कानउघडणी केली

या प्रकरणी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. विशाल काळे यांच्याकडेही मनपा आयुक्तांनी विचारणा करून दवाखान्याबाबत सातत्याने तक्रारी येत असताना आजवर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, अशा शब्दांत त्यांची कानउघडणी केली होती.

30 हजार नागरिक अवलंबून

मसानगंज दवाखान्यात बहुतांश गरजू, गरीब नागरिक साथरोग, सर्दी, खोकला, तापावर उपचार घेण्यासाठी येतात. येथे त्यांना तपासणी करून आवश्यकतेनुसार इंजेक्शन तसेच औषध दिले जाते. दवाखान्याची वेळ स. 9 ते दु. 1 पर्यंत असून सायं. 5 ते 7 पर्यंत आहे. या दवाखान्यावर येथील विविध रहिवासी भाग आणि 30 हजार नागरिक अवलंबून आहेत.

अपेक्षा बाळगण्यात अडचण

दवाखाना स. 9 वाजता उघडणे अनिवार्य असतानाही स. 10 पर्यंत दरवाजाच उघडला जात नव्हता. त्यानंतर फार्मासिस्ट किंवा चपराशीच येऊन निघून जायचे. परिणामी रुग्णांना औषधाेपचाराविनाच परतावे लागायचे. असे नेहमीचेच होऊन राहिले होते. आता मात्र मनपा आयुक्तांनी गंभीर दखल घेतल्यामुळे येथे व्यवस्थित औषधोपचार होतील, अशी अपेक्षा बाळगण्यात अडचण नाही.

बातम्या आणखी आहेत...