आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली प्रक्रिया:जिल्हा परिषदेतील 249 कर्मचाऱ्यांच्या बदल्या‎, 179 कर्मचाऱ्यांची मेळघाटवारी

प्रतिनिधी | अमरावती‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या‎ बदली प्रक्रियेत तीन दिवसांत २४९ ‎ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात‎ आल्या आहेत. यामध्ये १७९ ‎ ‎ कर्मचाऱ्यांची मेळघाटात तर ४७‎ ‎ कर्मचारी बदलीने सपाटीवर परतले ‎ ‎ आहेत. शुक्रवारी शिक्षण व आरोग्य ‎ ‎ विभागातील ५५ कर्मचाऱ्यांच्या‎ बदल्या करण्यात आल्या.‎

जिल्हा परिषदेत बुधवारी १०‎ मेपासून बदलीला सुरूवात झाली.‎ पहिल्या दिवशी सात विभागातील‎ ११४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात‎ आल्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन‎ विभागातील ८० तर शुक्रवारी शिक्षण‎ ‎ व आरोग्य या दोन विभागातील ५५‎ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पद‎ स्थापना देण्यात आली. जिल्हा‎ परिषदेच्या सभागृहात सकाळी ११‎ वाजेपासून बदली प्रक्रियेला सुरूवात‎ झाली. सीईओ अविश्यांत पंडा‎ यांच्यासह अतिरिक्त सीईओ संतोष‎‎ जोशी, उपमुख्य कार्यकारी‎ अधिकारी तुकाराम टेकाळे,‎ शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख,‎ एडीएचओ पाटील आदींचीं‎ उपस्थिती होती. सुरूवातीला शिक्षण‎ विभागाच्या बदल्यांना सुरूवात‎ कली आहे.

या विभागात केंद्र प्रमुख १, कनिष्ठ‎ महाविद्यालय शिक्षक १ यांची बदली‎ करण्यात आली. त्यानंतर आरोग्य‎ विभागातील आरोग्य सहाय्यक‎ महिला ६, आरोग्यसेवक महिला‎ ३९, औषध निर्माता अधिकारी ४ व‎ आरोग्य पर्यवेक्षक ४ अशा ५५‎ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात‎ आल्या आहेत. यामध्ये २९‎ कर्मचाऱ्यांची मेळघाटात तर ११‎ कर्मचाऱ्यांची सपाटीवर बदली‎ करण्यात आली. या तीन दिवसांत‎ २४९ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने‎ पदस्थापना देण्यात आली. या बदली‎ प्रक्रियेकरीता पंकज गुल्हाणे, राजेश‎ रोंघे, प्रमेश्वर राठोड, किशोर‎ गुल्हाणे, समीर लेंडे, श्रीकांत‎ मेश्राम, जयंत गंधे, नितिन माहोरे‎ आदी परिश्रम घेत आहेत, अशी‎ माहिती सूत्रांनी दिली.‎