आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल्या:शहर, ग्रामीणच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीएसआय, एपीआय आणि पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची यादी शुक्रवारी (दि. ९) दुपारी जाहीर झाली. या बदली यादीमध्ये अमरावती शहरातील एका महिला पीआयची बदली झाली असून, एक महिला पीआय ग्रामीणमधून आयुक्तालयात येणार आहेत. यासोबतच पीएसआय, एपीआयंच्यासुद्धा बदल्या झाल्या असून, काही बाहेरुन अमरावती शहर व ग्रामीणमध्ये येत आहेत.

अमरावती पोलिस आयुक्तालयातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलिमा आरज यांची बदली झाली. आरज यांची आगामी काळात सहायक पोलिस आयुक्त / पोलिस उपअधीक्षक म्हणून पदोन्नती होणार आहे. त्यामुळे त्यांना पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. याचवेळी अमरावती ग्रामीणला पीआय असलेल्या रिता उईके यांची अमरावती आयुक्तालयात, जळगाव येथे कार्यरत असलेले पीआय अवतारसिंग चव्हाण आणि नांदेड येथून पीआय अशोक जाधव यांची अमरावती ग्रामीणमध्ये बदली झाली आहे.

एपीआय असलेले अरुण राऊत यांची एटीएस, एपीआय अमुल बच्छाव यांची मुंबई शहर, एपीआय सचिन इंगळे आणि एपीआय हेमंत चौधरी यांची नागपूर शहर येथे बदली झाली आहे. तसेच अमरावती पोलिस आयुक्तालयातील एपीआय प्रशाली काळे यांची नागपूर शहर, एपीआय दत्ता देसाई यांची लोहमार्ग पुणे, एपीआय कविता पाटील यांची मुंबई शहर, एपीआय राहुल जाधव यांची अमरावती परिक्षेत्राला बदली झाली आहे. याचवेळी वर्धा येथून एपीआय मेघाली गावंडे, एपीआय महेन्द्र इंगळे आणि एसआयडीमधून एपीआय वैशाली चव्हाण या तिन अधिकाऱ्यांची अमरावती आयुक्तालयात बदली झाली आहे.

तसेच अमरावती पोलिस आयुक्तालयातून पीएसआय पंकज ढोके यांची नांदेड परिक्षेत्र, पीएसआय गणेश अहीरे यांची नाशिक परिक्षेत्र, पीएसआय अयुब शेख यांची नांदेड परिक्षेत्र, पीएसआय राजकिरण येवले यांची अमरावती परिक्षेत्रमध्ये बदली झाली आहे. याचवेळी अमरावती ग्रामिणमधील पीएसआय गणेश मुराडे यांची नांदेड परिक्षेत्र, पीएसआय मंजुषा ढोले यांची अमरावती आयुक्तालयात, नागपूर शहरातून पीएसआय तुळशिराम ढाकुलकर व पीएसआय मनिष गोडबोले यांची अमरावती शहर आयुक्तालयात बदली झाली असल्याचे यादीत नमूद आहे.

बातम्या आणखी आहेत...