आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली सभा:आज ज्येष्ठ रंगकर्मी  राजाभाऊ मोरे श्रद्धांजली सभा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आझाद हिंद मंडळाचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या श्रद्धांजली सभेचे रविवार, १८ डिसेंबर दुपारी साडेचार वाजता बुधवारा स्थित स्व. हरिभाऊ कलोती स्मारक मंदिरात आयोजन केले आहे.

स्व. राजाभाऊ मोरे नाट्य क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित होते. एक उत्कृष्ट दिग्दर्शक, नेपथ्यकार, नाट्य लेखक आणि नाट्य चळवळीतील पडेल ते काम करणारा एक बहुमुखी कार्यकर्ता म्हणून राजाभाऊंची ओळख होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कामगार कल्याण मंडळ नाट्य चळवळ, हौशी रंगभूमी अशा सर्वच नाट्य संस्थांशी त्यांचा जवळून संबंध होता. स्व. राजाभाऊंनी नाट्यक्षेत्राला आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सभेचे आयोजन केले. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन आझाद हिंद मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...