आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मध्य प्रदेशात युरिया खत घेऊन जाणारा ट्रक जप्त; ट्रकसह 240 बॅग जप्त, बनोडा पोलिसांची कारवाई

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील युरिया खत घेऊन मध्य प्रदेशात जाणारा एक ट्रक बेनोडा पोलिसांनी गुरुवारी (दि. १६) पहाटे तीन वाजेच्या सुमारास पकडला. या ट्रकमधून २४० बॅग युरिया जप्त करण्यात आले. पोलिसांनी ट्रक पकडल्यानंतर कृषी विभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली होती त्यामुळे कृषी विभागाचे पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

ट्रकचालक राम गोपाल कन्हैया लाल उरिया (३७, आठनेर, बैतुल) याला पकडले आहे. गुरुवारी पहाटे बेनोडाचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्यासह पोलिस पथक गस्तीवर असताना त्यांनी पांढर घाटीवरून मध्य प्रदेशात जाणाऱ्या एका मिनी ट्रकला संशयाच्या आधारे थांबवून त्याची तपासणी केली. त्यावेळी या ट्रकमध्ये कृभको युरिया, कृषभ भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड कंपनी लिहिलेले युरियाच्या २४० बॅग असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी ट्रक चालकाला युरिया बाबत विचारणा केली. त्यावेळी चालकाने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच या युरिया बद्दल कोणत्याही प्रकारचे दस्ताऐवज चालकाजवळ नव्हते.

पोलिसांनी ट्रक डिटेन करून पोलिस ठाण्यात जमा केला. पोलिसांनी याबाबत कृषी विभागाच्या पथकाला माहिती दिली होती. युरिया किंवा कोणत्याही खतांचे राज्याला तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आवंटन निश्चित केले राहते. त्यामुळे ते खत विना परवानगी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करता येत नाही. हा युरिया बुलडाणा जिल्ह्यातून मध्य प्रदेशात जात असल्यामुळेच पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन युरिया जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...