आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रुटीच्या पूर्ततेचा अहवाल:वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील: आ पाटील

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्येच सुरु व्हावे यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या समितीने काढलेल्या त्रुटीच्या पूर्ततेचा अहवाल आयोगाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात सोमवारी जमा करण्यात आला. या अनुषंगाने लवकरच फेर तपासणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. याच शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्हावासीयांची गरज व मागणी लक्षात घेवून उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र, महा विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा विषय अनेक दिवस प्रलंबित राहिला. सातत्याच्या पाठपुराव्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला.

मात्र प्रत्यक्षात महाविद्यालय सुरु करण्यासाठी कोणत्याही आवश्यक बाबींची पूर्तता पूर्णपणे करण्यात आली नाही. पद भरती देखील जुजबी स्वरुपात करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन क्षिक्षण मंत्री व इतर मंत्र्यांची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक पद भरती,जागा निश्चिती व हस्तांतरण, यंत्रसामग्री व फर्निचर खरेदी तसेच प्रयोगशाळा उभारणे याबाबत सविस्तर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले.

मात्र, अंमलबजावणी झाली नाही. आयोगाच्या निकषाप्रमाणे तयारी न करता समिती बोलावण्यात आली व त्यांनी अनेक गंभीर त्रुटी अहवालात निदर्शनास आणून दिल्या. या त्रुटींची पूर्तता न केल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी नाकारली. युती सरकार सत्तेत आल्यापासून या त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलली.त्यानुसार त्रुटी पूर्ततेचा अहवाल राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगास दाखल केला आहे. त्यानुसार फेर तपासणी करण्याची विनंती केली.

बातम्या आणखी आहेत...