आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅटेल्सचे बुकिंग फुल्ल:तुळशी विवाह आटोपले; आता लगीनघाई

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळशी विवाह आटोपल्यामुळे आता ज्यांच्या घरी मुले व मुलींचे विवाह निश्चित झाले आहेत, त्यांची सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. लग्नाचा बस्त, मुलगा व मुलीचे पोशाख, दागिणे, मंडप, डेकोरेशन, पत्रिका छापून घेणे, आमंत्रणं, कॅटरर्सची निश्चिती, मेन्यूची निश्चिती, घराची सजावट अशी कामे वेगात सुरू आहेत. बाजारात खरेदीसाठी जाण्याच्या तारखा निश्चित होत आहेत.

यंदा २५ नोव्हेंबरपासून लग्नाचा शुभ मुहूर्त आहे. नोव्हेंबर महिन्यात ४, डिसेंबर महिन्यात ८, जानेवारीत ४, फेब्रुवारीत सर्वाधिक १०, मार्च महिन्यात १८ तारखेपर्यंत ४ विवाह मुहूर्त आहेत. कार्तिक महिन्यात शुक्राचा अस्त असताना १० व १७ रोजी अत्यावश्यक असेल तर विवाह करता येणार आहेत. मार्च महिन्यात १८ तारखेपर्यंतच्याच विवाह मुहूर्ताचे राजंदेकर पंचांगात नोंद आहे. २२ रोजी गुढी पाडवा असून. त्यानंतरच नवे मुहूर्त मिळतील, अशी माहिती ज्योतिषाचार्यांनी दिली. सध्या शहरातील बहुतेक मंगल कार्यालय, लाॅन, हाॅटेल्स हे शुभ मुहूर्ताच्या तारखांना बुक झाले आहेत. दिवसाला १ लाखापासून ते प्रत्येक थाळीच्या हिशेबाने खर्च वाढत जाणारा आहे.

१८ डिसेंबरपर्यंत लग्न मुहूर्त त्यानंतर १ महिना खंड
गुरू व शुक्राचा अस्त यामुळे १८ डिसेंबरपासूून ते १८ जानेवारीपर्यंत एक महिना विवाहाचे शुभ मुहूर्त नाहीत. राजंदेकर पंचागांतही १८ मार्च २०२३ पर्यंतचेच मुहूर्त देण्यात आले आहेत. त्यानंतर २२ मार्च रोजी गुढीपाडावा आहे. त्यानंतर नवीन पंचांगाच्या आधारे विवाह मुहूर्त दिले जातील. -पं. संजय शहाकर, ज्योतिषाचार्य, अमरावती.

सर्व तारखांना मंगल कार्यालये, लाॅन बुक
२५ नोव्हे. ते १८ मार्चपर्यंतच्या विवाह मुहूर्तांसाठी शहरातील लहान-मोठी मंगल कार्यालये व लाॅन्स बुक आहेत. ज्यांचे ऐनवेळी विवाह निघाले आहेत, ते सध्या मंगल कार्यालय, लाॅन तसेच हाॅटेल्सच्या शोधात आहेत. २४ तासाला मंगल कार्यालय, लाॅन्स व हाॅटेलचे चे दर हे १ लाखापासून ते जेवण खर्च मिळवता ५ लाखापर्यंत आहेत.

बातम्या आणखी आहेत...