आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचप्रकरणी अटक:55 हजारांच्या लाचप्रकरणी पीएसआयसह दोघांना अटक

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

55 हजारांच्या लाचप्रकरणी पीएसआयसह दोघांना अटकबनावट खत प्रकरणात आरोपी न करण्यासाठी ५५ हजारांच्या लाच प्रकरणी पीएसआयसह एका खासगी व्यक्तीला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी शहरातील नवसारी भागातील एका हॉटेलसमोर करण्यात आली.

वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पीएसआय अयुब हिराजी शेख (३९) व खासगी व्यक्ती मिलिंद दादाराव चौधरी (४०), रा. हर्षराज कॉलनी, अमरावती अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांशिवाय मकसुद अली कादर अली (रा. सौदागरपुरा, वलगाव) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. वलगाव पोलिस ठाण्यात सुमारे दीड महिन्यांपूर्वी बनावट खत प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तक्रारकर्त्याला पोलिस उपनिरीक्षक अयुब शेख यांनी मिलिंद चौधरी व मकसुद अली या दोघांच्या माध्यमातून ६० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ५५ हजारांत व्यवहार ठरला. याबाबत तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी करून गुरुवारी दुपारी सापळा रचला. यावेळी मिलिंद चौधरी याने लाच स्वीकारताच त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अयुब शेख यांनाही अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...