आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालखडी परिसरातील मुजफ्फरपुरा भगाात क्राईम ब्रँचच्या पथकाने धाड टाकून अवैध गॅस रिफिलिंगचा भंडाफोड केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ३) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवैध गॅस रिफीलींग करणाऱ्यासह एका प्रवाशी ऑटो चालकाला पकडले आहे. तसेच एक प्रवाशी ऑटो जप्त करण्यात आला आहे. समीर खान रहेमत खान (३०, रा. मुजफ्फरपुरा) व ऑटो चालक नूर अली अशफाक अली (४२, रा. गुलिस्तानगर) यांना पोलिसांनी पकडले आहे. मुजफ्फरपुरा येथे घरगुती सिलिंडरमधून प्रवासी ऑटोत गॅस रिफिलिंग करण्यात येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या क्राइम ब्रँचचे उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे व त्यांच्या पथकाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पथकाने मुजफ्फरपुरा येथे धाड टाकली. यावेळी घरगुती वापराच्या सिलिंडरमधून एका मशिनच्या मदतीने प्रवाशी ऑटोरिक्षामध्ये गॅस रिफिलिंग सुरू होते. त्यामुळे पोलिसांनी समीर खान रहेमत खान व नूर अली अशफाक अली या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गॅस सिलिंडर, इंडक्शन मोटार, गॅस रिफिलिंग मशिन व ऑटो असा एकूण १ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे व त्यांच्या पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.