आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अमरावती-अकोट मार्गावर जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; सुटका केलेल्या 14 गुरांची गोरक्षणामध्ये रवानगी

दर्यापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अमरावती-अकोट मार्गावर मालवाहू वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शन खाली ठाणेदार प्रमेश आत्राम यांचे नेतृत्वात पोलिस पथकाने गुरूवारी (दि. १६) सकाळी पावणेसातच्या सुमारास मूर्तिजापूर टी-पाइंटसमोर सापळा रचून दर्यापूर मार्गे अकोट कडे जाणाऱ्या दोन मालवाहू बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी केली असता, त्यात प्रत्येकी ७ अशी एकूण १४ जनावरे निर्दयतेने कोंबून असलेली आढळली. पोलिसांनी जनावरांना जीवनदान देत त्यांची रवानगी गोरक्षण मध्ये केली. या प्रकरणी पोलिसांनी सय्यद अल्फाज सय्यद अकबरावर (२२) व अवेसुद्दीन सलामहुद्दीन (२२) दोघेही रा. माना, जि. अकोला यांना अटक केली.

पोलिसांनी मालवाहू बोलेरो पिकअप वाहन (एमएच ३०/ बी डी ३९२६) व (एमएच ३०/ बी डी २७६४) व चालकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...