आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्कम बचावली:वरुड येथे एकाच रात्री दोन एटीएम फोडले; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

शेंदुरजनाघाट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री वरुड शहरात दोन एटीएम फोडल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली. मात्र चोरट्याला एटीएम पूर्णपणे फोडण्यात यश न आल्याने एटीएममधील रक्कम चोरीला जाण्यापासून बचावली. ही घटना बँक ऑफ इंडिया व इसाफ मायक्रो फायनान्स कंपनीच्या एटीएममध्ये घडली. बँकेच्या मुंबई कंट्रोल रूममधून एटीएम फुटताच वरुड पोलिसांना फोन आला. अवघ्या काही क्षणात वरुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्वरित चोरट्यांचा शोध सुरू केला. सकाळच्या सुमारास एलसीबीची चमू शहरात दाखल झाली. बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध सुरू झाला.

बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव व मोर्शीचे एसडीपीओ डॉ. नीलेश पांडे यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी करत आढावा घेतला.

मशीनवरील हाताचे ठसे घेण्याकरिता अमरावती येथून ठसे तज्ज्ञांना पाचारण‌ करण्यात‌ आले आहे. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटा आढळला असून, त्याच्या चेहऱ्यावर मात्र पांढरा रंगाचा दुपट्टा आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. फोडण्यात आलेले दोन्ही एटीएम जवळच आहेत. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौवगावकर याच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...