आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाने धडक‎:पांढरीनजीक अपघातात दोन‎ दुचाकीस्वार गंभीर जखमी‎

अंजनगाव सुर्जी‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा मार्गावर पांढरीनजीक‎ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक‎ दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघे‎ गंभीर जखमी झाले. ही घटना‎ सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या‎ सुमारास घडली. अनुराग कोरे‎ (३०) व उमेश उईके (३०) दोघेही‎ रा. पोकरना, ता. भैसदही, जि. बैतुल‎ (मध्य प्रदेश) अशी जखमींची नावे‎ आहेत.‎ घटनेच्या वेळी ते दुचाकीने‎ (एमपी ४८/ एमएन ५७२८) जात‎ असताना पांढरी जवळ अज्ञात‎ वाहनाने त्यांना धडक दिली. त्यांना‎ प्रथम अंजनगाव येथील ग्रामीण‎ रुग्णालयात व तेथून पुढील‎ उपचारासाठी अमरावती येथील‎ जिल्हा सामान्य रुग्णालयात‎ पाठवण्यात आले. दोन्ही जखमी हे‎ पांढरी येथील जिनिंग फॅक्टरी येथे‎ मजुरी करत असून, ते पांढरीवरून‎ काही कामानिमित्त पथ्रोट येथे जात‎ होते. पुढील तपास अंजनगाव‎ पोलिस करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...