आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण सोडतीकडे लक्ष:अमरावती जिल्ह्यातील 9 नगरपालिका, 2 नगरपंचायतींची आरक्षण सोडत 13 जून रोजी

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेपाठोपाठ जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार, 13 जून रोजी या नगरपालिकांमधील वार्डांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. कोणता वार्ड एससीसाठी, कोणता एसटीसाठी तर कोणता महिलांसाठी हे या सोडतीद्वारे निश्चित केले जाईल. ओबीसीचा मुद्दा न्यायप्रवीष्ट झाल्यामुळे सध्या त्या संवर्गाचे आरक्षण ठरविण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश नाहीत.

कोणत्या नगरपालिकेची सोडत

दरम्यान आरक्षण निश्चित होणार असल्याने कुणाला धक्का बसणार आणि कुणाला लॉटरी लागणार, हेही स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सदर आरक्षण सोडतीकडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील वार्डांचे आरक्षण अलिकडेच निश्चित करण्यात आले. तर जिल्हा परिषदेसाठीची हीच प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जिल्हा निवडणुकमय झाला असून येत्या काही दिवसांत सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मोसम दिसून येणार आहे. तूर्त सहकार विभागाच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे चालू वर्ष हे कदाचित निवडणूक वर्ष तर नव्हे ना, अशी सर्वसामान्यांची शंका आहे. जिल्ह्यातील ‘अ’ वर्गात मोडणारी अचलपूर, ‘ब’ वर्गात मोडणारी अंजनगाव सुर्जी व वरुड तसेच ‘क’ वर्गातील चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी व शेंदुरजनाघाट या नगरपालिकांचा कार्यकाळ गतवर्षी दिवाळीच्या आसपास संपुष्टात आला.

ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली न निघाल्यामुळे सदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत. सध्या या सर्व ठिकाणी प्रशासकांच्या माध्यमातून दैनंदिन कारभार हाताळला जात आहे. जिल्ह्यात चार नगरपंचायतींही आहेत. त्यापैकी तिवसा आणि भातकुलीची निवडणूक पार पडली. आरक्षणाची सोडत काढताना नांदगाव खंडेश्वर व धारणी येथे सदोष प्रक्रिया राबविली गेली होती. त्यामुळे तेथील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने थांबविली होती. आता नव्याने प्राप्त वेळापत्रकात या दोन नगरपंचायतींचाही समावेश करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...