आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:कोसळलेल्या अतिजीर्ण इमारतीच्या दोन मालकांना केली अखेर अटक

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभात चौकातील अतिशिकस्त इमारत कोसळून रविवारी (दि. ३०) दुपारी पाच जणांचा मलब्याखाली दबून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्रीच या इमारतीच्या असलेल्या मालकांपैकी दोन मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या दोघांनाही मंगळवारी (दि. १) अटक करण्यात आली आहे.

हर्षल भरत शहा (४१) व ६५ वर्षीय महिला (दोघेही रा. शिलांगण रोड, अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी दुपारी हर्षल शहाला न्यायालयात हजर केले असता त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महापालिकेच्या राजापेठ झोनचे उपअभियंता सुहास चव्हाण यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्रीच हर्षल शहा व एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला होता. घटनेची भीषणता पाहता पोलिसांनी हर्षल शहा हा अमरावतीत पोहोचताच त्याला अटक केली, अशी माह्ती शहर कोतवालीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलीमा आरज यांनी दिली आहे.

दरम्यान, प्रभात चौकातील राजेंद्र लाजच वरचे दाने मजले शिकस्त झाल्याचे तर खालच्या मजल्याला जर कोणताही धक्का पोहोचला नाही किंवा हात लागला नाही तरच तो शाबूत राहील, असे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. तरीही, बांधकाम तज्ज्ञांच्या अनुपस्थितीत राजदीप एम्पोरियम व बॅग हाऊसची दुरुस्ती करण्यात आली. यावेळी केवळ बांधकाम कामगार उपस्थित होते. कोणताही बांधकाम तज्ज्ञ नव्हता, त्यामुळे ही घटना घडली, अशी माहिती मनपा कार्यकारी अभियंता दोन यांनी दिलीे.

मनपाने ही राजेंद्र लॉजची इमारत शिकस्त व अतिधोकादायक असल्यामुळे ती पाडण्यात यावी, अशा आशयाची तिसरी नोटीस २० ऑक्टाे. २०२२ रोजी कलम २६४,२६८ नुसार सर्वांना बजावली होती. तळमजल्यावरील पाच दुकानदारांनी स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन प्रजापती यांचा अहवाल (स्ट्रक्चर स्टॅबिलीटी सर्टीफिकेट ) तत्पूर्वीच ७ सप्टे. २०२१ रोजी मनपाला सादर केला होता.

ही इमारत शिकस्त असल्याने ती पाडणे आवश्यक आहे. असे कळल्यानंतर राजेंद्र लाॅजचे मालक राहुल जैन यांनी पहिल्या व दुसऱ्या मजल्याचे बांधकाम २३ जुलै २०२२ रोजी पाडले. परंतु, तळमजल्यावरील पाचही दुकान मालकांनी नियमितपणे दुकाने सुरू ठेवली. एवढेच नव्हे तर कोणत्याही तज्ज्ञ बांधकाम अभियंत्यांचे मार्गदर्शन न घेता निष्काळजीपणे, सुरक्षा उपायांशिवाय राजदीप एम्पोरियम व बॅग हाऊस या दुकानाची दुरुस्ती सुरू करण्यात आली. त्यामुळे दोन्ही दुकानांचे छत कोसळून त्याखाली दबून पाच बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. यासाठी राजदीप एम्पोरियमचे मालक हर्षल शहा व अन्य एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकान मालकांनी अहवालाकडे कानाडोळा केला शिकस्त इमरातींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणारे स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन प्रजापती मनपाच्या पॅनलवरीलच आहेत. त्यांनी योग्य तोच अहवाल दिला होतो. परंतु, तळमजल्यावर असलेल्या दुकान मालकांनी त्याचे तंतोतंत पालन केले नाही. स्लॅबला तोलून धरण्यासाठी राजदीप एम्पोरियम व बॅग हाऊसमध्ये आडवा गर्डर टाकताना चूक झाली. त्यामुळे स्लॅब कोसळल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...