आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अकोट:पिल्लांना ठार मारल्याने चवताळलेल्या अस्वलाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

अकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत झालेली अस्वलाची पिल्ले

मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभागामधील वनपरिक्षेत्र सोनाळा, वरवट बकाल वर्तुळ दक्षिण आलेवाडी नियत क्षेत्रात एका अस्वलाने दोघांवर प्राणघातक हल्ला चढवला. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांच्या मृतदेहांपासून काही अंतरावर अस्वलाची दोन पिल्ले मृतावस्थेत आढळून आली. त्यामुळे या दोन्ही पिल्लांना मारल्यामुळे अस्वल चवताळले असावे आणि त्याने दोघांवर हल्ला चढवला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान घडली.

आलेवाडी नियत क्षेत्रामध्ये कक्ष क्रमांक ३५७ खडकपाणी या ठिकाणी निमखेडी येथील अशोक मोतीराम गवते (५२) आणि माणा बंडू गवते (४२) हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे गाभा क्षेत्रातील खडकपाणी (सागमल्ली) नियतक्षेत्रात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती सकाळी ९ ते ९.३० वा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना समिती निमखेडीचे अध्यक्ष नक्कलसिंग यांनी मोबाइलवरून ए. आर. तोटे, वनरक्षक दक्षिण आलेवाडी बीट यांना दिली.

0