आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक सत्र:स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी दोन निवासी शाळांची निवड

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ या अभियानांतर्गत २०२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जिल्ह्यातील चार शासकीय निवासी शाळांचे निवड झाली आहे.

यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शाळा, दर्यापूर तालुक्यातील सामदा कासमपूर येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शैक्षणिक संस्थांनी या पुरस्कारासाठी ऑनलाइन सहभाग नोंदवला होता. त्यानंतर निवड समितीने प्रत्यक्ष भेट देऊन शाळांची तपासणी केली.

बातम्या आणखी आहेत...