आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीत चित्र:अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन साईभक्तांचा मृत्यू

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर-शिर्डी महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन साई भक्तांचा मृत्यू झाला. धडक देणारे वाहन खासगी ट्रॅव्हल्स बस असल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. पोलिस या खासगी बसचा शोध घेत आहेत.

संजय शंभू जाधव (२३), महेश शंकरसिंग (३०, रा. मीरारोड, मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे तरुणांची नावे आहेत. साई भक्त पायी शिर्डीच्या दिशेने जात होते. सकाळी पावणेसहाच्या सुमारास पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...