आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकाने जळाली:अंजनगाव बसस्थानकाजवळ आगीत दोन दुकाने जळाली; दोन्ही दुकाने व दुकानातील साहित्य जळून खाक

अंजनगांव सुर्जी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन बस्थानकानजिक परतवाडा रोडवर रस्त्यालगत असलेल्या पंक्चर दुकान व चहा टपरीला रविवारी सकाळी ३.३० ते ४ च्या दरम्यान अचानक आग लागल्याने दोन्ही दुकाने व दुकानातील साहित्य जळून खाक झाले.

अंजनगांव ते परतवाडा मार्गावर पेट्रोल पंपासमोर रस्त्यालगत काही व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्यापैकी गुड्ड अन्सारी यांच्या हिंदुस्थान टायर वर्क्स व राजेश चोर पगार यांच्या चहा टपरी-रसवंतीला पहाटे ३:३० ते ४ दरम्यान अचानक आग लाग लागली. या घटनेची माहिती काही व्यक्तींनी अग्निशमन दलाला दिली. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आणली गेली. या दुकानांच्या समोरच पेट्रोल पंप होते.

आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशामक दलाचे कर्मचारी अरूण माकोडे, अब्दुल कलाम व गौरव इंगळे कर्तव्यावर होते. या आगीत दोन्ही दुकानाचे चार ते साडेचार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून आग लागल्याने आगीत नुकसान झालेल्या दुकान मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे कळले नसून या घटनेचा तपास अंजनगांवचे ठाणेदार दीपक वानखडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...