आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किराणा सामान घेऊन युवक दुचाकीने (एमएच २७/ बीएल ५९३४) धारणीवरून बेरदा भुरू येथे येत होता. दरम्यान, त्याचवेळी विरुद्ध बाजूने भरधाव दुचाकीने (एमएच २७/ बीके ४९४६) धडक दिली.

यामध्ये शिवराम ठाकूर कासदेकर याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास नरवाटी फाट्यानजीक घडली. या प्रकरणी मृताचा चुलत भाऊ लखन मंगल कासदेकर (२७) रा. बेरदा भुरू याने धारणी पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...