आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक:दोघे गंभीर जखमी, गोराळा-पिंगळाई मार्गावरील घटना, पोलिसांकडून तत्काळ मदत

अमरावती-शिरखेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोराळा पिंगळाई येथील कुलस्वामिनी पेट्रोल पंपाजवळ एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार दोघे जण गंभीर जखमी झाले. काही वेळाने नागरिकांनी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. अपघातात जखमी झालेल्या दोघांमध्ये दुचाकीचालक शिवम कावनपुरे (वय 32 वर्षे, रा. नांदगाव पेठ) व त्याचा मित्र प्रदीप टेकाडे (वय 41, रा. चिंचखेड) यांचा समावेश आहे.

लेहगावकडून अमरावतीकडे जात होते

हे दोघेही दुचाकी (क्र. एमएच 27 डी एफ 4144) ने लेहगावकडून अमरावतीकडे जात होते. दरम्यान एका अज्ञात वाहनाने कुलस्वामीनी पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक देऊन पळ काढला. या धडकेमुळे दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी अवस्थेत पडून होते. या मार्गावरून धावणारे कोणतेच वाहन थांबण्यास किंवा जखमींना घेण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतलेल्या नागरिकांना विलंब झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक तथा बीट इन्चार्ज किशन धुर्वे, पोलिस जमादार राजू इंगळे हे घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात वाहनाचा कसून शोध सुरु केला आहे. सध्या या अपघाताची शिरखेड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रस्त्यावर लवकर व्हावे पेट्रोलिंग

केंद्र सरकारने अलिकडेच दर 100 मीटर अंतरावर मदतनीस उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. परंतु अद्याप त्या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली नाही. त्यामुळे रस्त्यावर लवकर पेट्रोलिंग सुरु करुन अशा अपघातग्रस्तांना मदत देणे सुरु करावे, अशी मागणी पुढे आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली होती. रस्ता अपघातातील कोणाचाही मृत्यू होऊ नये, अशी यामागची भूमीका आहे.

पोलिस कर्मचारी देवासारखे धावले

अपघातानंतर बहुधा उपयोगात येणारी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी शिरखेड पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस कर्मचारी मोहन सोळंके हे कामी आले. ते आपल्या परिवारासह अमरावतीला जात होते. त्यांनी आपले वाहन थांबवून गंभीर जखमींना आपल्या वाहनांमध्ये घेत अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचविले. अशाप्रकारे दोन्ही जखमींवर उपचार करणे सुरु झाले असून त्यांचे प्राण बचावले.

बातम्या आणखी आहेत...