आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीवरुन परतवाड्याकडे जाणाऱ्या तरुणांची दुचाकी रस्त्यावर नादुरूस्त असल्यामुळे उभा असलेल्या ट्रकवर जावून धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोन मित्रांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ५) उशिरा रात्री परतवाडा मार्गावरील आष्टी ते मार्कीदरम्यान घडली आहे. छोटू ऊर्फ राजू बाळकृष्ण अवघड (३२) आणि योगेश ओंकारराव धर्माळे (४०, दोघेही रा. येवती, ता. अचलपूर) असे मृतकांची नावे आहेत. छोटू आणि योगेश हे मित्र होते. गुरूवारी काही कामानिमीत्त ते दुचाकीने गावावरुन अमरावतीला आले होते.
शहरातील काम आटोपून रात्री ते दुचाकीनेच गावी परत जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान वलगावसमोर गेल्यानंतर आष्टी ते मार्की गावादरम्यान एक नादुरूस्त ट्रक रस्त्यात उभा होता. हा ट्रक दुचाकीचालकाला न दिसल्यामुळे छोटू व योगेश यांची दुचाकी थेट ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणले मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी छोटू यांचे बंधू संदीप अवघड यांनी वलगाव पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.