आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री गस्त:दुचाकी चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात ; ​​​​​​​बुलेटसह दोन दुचाकी जप्त

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या बुलेटसह दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी केली आहे.रोहीत रवीदास डोंगरे (२३, रा. मोर्शी जि. अमरावती, ह.मु. खामला, नागपुर) आणि शुभम बबलु हाडके (२४, रा. खामला जुनिवस्ती, नागपुर) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांचे नाव आहेत. याचवेळी दोघांचा एक साथीदार पसार झाला आहे. गुन्हे शाखेचे पथक सोमवारी मध्यरात्री गस्त घालत होते. त्याचवेळी दस्तुरनगर ते छत्री तलाव मार्गावर मध्यरात्री पावणे तीन वाजताच्या सुमारास एक तरुण बुलेट वाहनावर बसलेला व त्याच्या मागुन दोन युवक हे मोपेड वाहनावर होते.

यावेळी मोपेड वरील युवक बुलेटला ‘टो’ करुन घेवून जात असतांना दिसले. हा प्रकार पाहून पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहनांना थांबवुन वाहनांचे कागदपत्रांबाबत विचारणा केली. मात्र त्या तरुणांजवळ दोन्ही वाहनांचे कागदपत्रे नसल्याने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी बुलेट चालवणारा पोलिसांना चकमा देऊन पसार झाला. दोन तरुणांना ताब्यात घेतले. पसार झालेल्या तरुणाचे नाव प्रणव संजय ठाकरे (रा. खामला जि.नागपुर) असे आहे. या तिघांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याचवेळी मोपेड कुठली व कोणाची आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, राजेंद्र काळे, देवेंद्र कोठेकर, दिनेश नांदे, मोहम्मद सुलतान, विशाल वाकपांजर, प्रशांत नेवारे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...